बॉलीवूड अभिनेत्रीने हार्दिक पंड्याला डेट करण्याबद्दल ७ वर्षांनी सोडलं मौन; म्हणाली…
बॉलीवूड अभिनेत्री ईशा गुप्ताने क्रिकेटपटू हार्दिक पंड्याबरोबरच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे. काही काळ ते दोघे बोलत होते, पण डेटिंगच्या टप्प्यावर नातं पोहोचलंच नव्हतं. ईशाने सांगितलं की, ते एकमेकांसाठी योग्य नव्हते आणि त्यामुळे नातं पुढे गेलं नाही. हार्दिकच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्याला टीकेचा सामना करावा लागला होता, पण त्याचा त्यांच्या नात्यावर काही परिणाम झाला नव्हता.