“यापूर्वी कलाकाराचं इतकं…”, आलिया भट्ट ‘सैयारा’ फेम अहान पांडेबद्दल नेमकं काय म्हणाली?
मोहित सुरी दिग्दर्शित 'सैयारा' चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. अभिनेत्री आलिया भट्टने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चित्रपटातील कलाकार अहान पांडे व अनित पड्डा यांचं कौतुक केलं आहे. आलियाने म्हटलं की, "दोन अप्रतिम कलाकार जन्माला आले आहेत." तिने चित्रपटाचे दिग्दर्शक मोहित सुरी यांचंही कौतुक केलं आहे. अनित पड्डाने आलियाचे आभार मानले आहेत.