गुरु दत्त यांची साथ वहीदा रहमान यांनी का सोडली होती? काय होतं कारण?
वहीदा रहमान आणि गुरु दत्त हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध जोडी होते. त्यांनी 'प्यासा', 'कागज के फूल', 'चौदहवी का चांद' या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. गुरु दत्त यांची आज जन्म शताब्दी आहे. 'कागज के फूल' चित्रपटाच्या अपयशामुळे गुरु दत्त नैराश्यात गेले आणि त्यांनी चित्रपट बनवणं थांबवलं. वहीदा रहमान यांनी आर्थिक कारणांमुळे आणि मतभेदांमुळे गुरु दत्त यांची साथ सोडली.