माझी मान शरमेने खाली गेली, तालिबानी नेत्याचं भारतातलं स्वागत पाहून जावेद अख्तरांची नाराजी
तालिबानचे परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्ताकी यांच्या भारत दौऱ्यावरून प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुत्ताकी यांना भारतात दिलेला सन्मान पाहून अख्तर म्हणाले, माझी मान शरमेने खाली गेलीय. त्यांनी देवबंद संस्थेवर टीका केली, कारण त्यांनी तालिबानच्या प्रतिनिधीला 'इस्लामिक हिरो' म्हणून स्वागत केले. अख्तर यांच्या मते, अशा व्यक्तीचा सत्कार करणं म्हणजे महिलांच्या शिक्षणाला विरोध करणाऱ्यांना मान्यता देण्यासारखं आहे.