“ती काळी आहे, तिला कास्ट करू नको”, रंगामुळे नाकारलं काम; मराठी अभिनेत्रीने सांगितला अनुभव
मराठी अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी मनोरंजन क्षेत्रातील वर्णभेदाचा अनुभव सांगितला. त्यांनी सांगितलं की, एकदा एका टीव्ही प्रोजेक्टसाठी त्यांना काळ्या रंगामुळे रिजेक्ट केलं होतं. पल्लवी म्हणतात की, आपल्या समाजात अजूनही गोऱ्या रंगाचं वेड आहे आणि वर्णभेद व लिंगभेद कायम आहेत. पल्लवी लवकरच 'द बंगाल फाइल्स' सिनेमात दिसणार आहेत, जो ५ सप्टेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.