खातू कुटुंबाचं रहस्य उलगडणारी ‘अंधार माया’, कोकणातल्या वाड्याची गोष्ट पाहून उडेल थरकाप
'अंधार माया' ही झी ५ वर प्रदर्शित झालेली सात भागांची वेब सीरिज आहे. कोकणातील एका वाड्यात घडणारी रहस्यमय कथा यात दाखवली आहे. दिनूशेठच्या मृत्यूनंतर त्याच्या तेराव्यासाठी आलेल्या कुटुंबीयांच्या तीन दिवसांच्या वास्तव्यात वाड्यातील रहस्यं उलगडतात. किशोर कदम, शुभंकर तावडे, ऋतुजा बागवे यांच्या अभिनयाने सजलेली ही सीरिज भीती आणि उत्कंठा वाढवते. दिग्दर्शक भीमराव मुडे यांनी काळजाचा ठाव घेणारी कथा साकारली आहे.