“किती शिव्या द्यायच्यात त्या द्या…”, शरद पोंक्षेंचं स्पष्ट वक्तव्य; म्हणाले, “भाजपाशिवाय…”
प्रसिद्ध मराठी अभिनेते महेश कोठारे यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींचं समर्थन केल्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली. अभिनेत्री मेघा धाडेने कोठारेंच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर केली, ज्यावर शरद पोंक्षे यांनीही आपलं मत व्यक्त केलं. पोंक्षे म्हणाले की, ते मोदी आणि अमित शहांचं कौतुक करतात आणि सद्य परिस्थितीत भाजपाशिवाय देशाला पर्याय नाही.