“या विकृत लोकांना…”, मालेगावच्या चिमुरडीवरील अत्याचाराबद्दल शशांक केतकरच्या पत्नीचा संताप
नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात साडेतीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. अभिनेत्री प्रियांका केतकरने सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. तिने न्यायव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आणि अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. राज्य शासनाने या प्रकरणाची दखल घेतली असून, खटला 'फास्ट ट्रॅक' कोर्टात चालवण्याची तयारी दर्शविली आहे.