“तुम्ही प्रथा करा पण…”, मराठी अभिनेत्रीने ‘कन्यादान’बद्दल व्यक्त केलं मत; म्हणाली…
अभिनेत्री रुचिरा जाधवने मराठी मालिका, चित्रपट आणि रिअॅलिटी शोमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या रुचिराने नुकत्याच एका मुलाखतीत 'कन्यादान' या विधीबद्दल तिचं मत व्यक्त केलं आहे. तिने 'कन्यादान नाही तर कन्या मान' असं मत मांडलं आहे. रुचिराने स्त्रियांना त्यांच्या मुलांना स्वतःचं नाव देण्याचा अधिकार असावा असंही म्हटलं आहे. दरम्यान, ती सध्या 'तू ही रे माझा मितवा' या मालिकेत काम करत आहे.