टॉम क्रूझच्या ‘मिशन इम्पॉसिबल’ला ‘अमूल’कडून अनोखी मानवंदना, ‘त्या’ फोटोने वेधलं लक्ष
'मिशन इम्पॉसिबल' चित्रपट मालिकेचा आठवा आणि शेवटचा भाग 'मिशन इम्पॉसिबल द फायनल रेकनिंग' १७ मे रोजी भारतात प्रदर्शित झाला. यानिमित्त टॉम क्रूजच्या इथन हंट पात्राला 'अमूल'ने अनोखी मानवंदना दिली आहे. 'अमूल'ने क्रूजचे कार्टून स्केच शेअर केले आहे, ज्यात तो एका हाताने हेलिकॉप्टरचे हँडल आणि दुसऱ्या हातात बटर टोस्ट पकडलेला दाखवला आहे. या स्केचसह त्यांनी 'अशक्य चवदार' असं कॅप्शनही शेअर केलं आहे.