अशोक सराफांनी सांगितला सचिन पिळगांवकरांबद्दलचा किस्सा; म्हणाले, आधी मैत्री नव्हती पण…”
अभिनेते अशोक सराफ यांनी सचिन पिळगांवकर यांच्याबरोबरच्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा दिला. ९० च्या दशकात लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर आणि अशोक सराफ यांची मैत्री रुपेरी पडद्यावर आणि खऱ्या आयुष्यातही घट्ट होती. 'मायबाप' चित्रपटानंतर सचिनने दिग्दर्शित केलेल्या १५ मराठी चित्रपटांमध्ये अशोक सराफ होते. त्यांच्या मैत्रीमुळे त्यांनी अनेक हिट सिनेमे दिले.