दिलीप प्रभावळकरांनी सांगितला ‘दशावतार’मधील अंडरवॉटर सीन करतानाचा थरारक अनुभव; म्हणाले…
सध्या 'दशावतार' सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे. दिलीप प्रभावळकर यांनी बाबुली मेस्त्रीच्या भूमिकेत उत्कृष्ट अभिनय केला आहे. ८१ व्या वर्षी त्यांनी ॲक्शन सीन्स आणि अंडरवॉटर सीन करून प्रेक्षकांना चकित केले आहे. अंडरवॉटर सीनसाठी त्यांनी घेतलेल्या मेहनतीबद्दल त्यांनी मुलाखतीत सांगितले. 'दशावतार'ला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून, दिलीप प्रभावळकरांसह अनेक कलाकारांनी यात भूमिका साकारल्या आहेत.