‘दशावतार’बद्दल ‘कांतारा’च्या दिग्दर्शकाची प्रतिक्रिया, ऋषभ शेट्टी म्हणाला…
सुबोध खानोलकर लिखित आणि दिग्दर्शित 'दशावतार' सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. कोकणातील बाबुली मेस्त्रीची ही गोष्ट मराठी रसिकांनी डोक्यावर घेतली आहे. 'कांतारा'चे दिग्दर्शक ऋषभ शेट्टी यांनी 'दशावतार'बद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की, "मी लवकरच हा सिनेमा बघणार आहे." 'दशावतार'मध्ये दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव यांसारखे कलाकार आहेत. १२ सप्टेंबर रोजी आलेला हा सिनेमा अजूनही प्रेक्षकांचं मनोरंजन करीत आहे.