किशोर कदम यांची राहत्या घरासंदर्भात पोस्ट; मुख्यमंत्र्यांकडे केली विनंती म्हणाले…
अभिनेते किशोर कदम यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या राहत्या घराला धोका निर्माण झाल्याचं सांगितलं आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांसह इतर राजकीय नेत्यांना मदतीचं आवाहन केलं आहे. त्यांच्या सोसायटीतील रीडेव्हलपमेंट प्रक्रियेत PMC आणि बिल्डरच्या संगनमताने घोटाळा झाल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. त्यांनी सरकारला तातडीने लक्ष घालण्याची विनंती केली आहे.