“शाहरुख नाही तर भरत जाधव यांचे…”, निखिल चव्हाणचं वक्तव्य; म्हणाला, “आम्ही मराठी…”
भरत जाधव हे मराठीतील प्रसिद्ध अभिनेते असून त्यांनी नाटक, मालिका व चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'आता थांबायचं नाय' चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचं कौतुक झालं. अभिनेता निखिल चव्हाणने भरत जाधव यांच्याबरोबर 'धोंडी चंप्या' चित्रपटात काम करण्याचा अनुभव शेअर केला. निखिलने भरत जाधव यांच्याकडून आयुष्याचा समतोल साधण्याचे धडे घेतले.