‘दशावतार’बद्दल राज ठाकरेंनी व्यक्त केलं मत, मांडलेल्या सामाजिक विषयाचं कौतुक; म्हणाले…
मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या 'दशावतार' सिनेमाची जोरदार चर्चा आहे. १२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने तीन दिवसांत कोटींची कमाई केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या सिनेमाचं कौतुक केलं आहे. त्यांनी सिनेमातील गंभीर विषय, कलाकारांचं काम, छायाचित्रण, संगीत आणि दिग्दर्शनाचं विशेष कौतुक केलं. राज ठाकरे यांनी सर्वांनी हा सिनेमा पाहावा असं आवाहन केलं आहे.