“अजून चांगली परिस्थिती…”, मराठी चित्रपटांबद्दल उमेश कामतची प्रतिक्रिया; म्हणाला…
मराठी चित्रपटांनी गेल्या दोन महिन्यांत चांगले यश मिळवले आहे. 'एप्रिल मे ९९', 'गुलकंद', 'आता थांबायचं नाय' आणि 'जारण' या चित्रपटांनी प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. अभिनेता उमेश कामतने मराठी चित्रपटांना मिळणाऱ्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. त्याने प्रेक्षकांचा प्रतिसाद आश्वासक असल्याचे म्हटले. लवकरच त्याचा 'येरे येरे पैसा ३' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.