दीपक शिर्के यांनी सांगितली लक्ष्मीकांत बेर्डेंची आठवण; खास किस्सा केला शेअर
प्रसिद्ध मराठी अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणींना उजाळा देत ज्येष्ठ अभिनेते दीपक शिर्के यांनी एक किस्सा शेअर केला आहे. लक्ष्मीकांत बेर्डे आणि दीपक शिर्के यांनी अनेक सिनेमांत एकत्र काम केले आहे. दीपक शिर्के यांनी सांगितले की, लक्ष्मीकांत बेर्डे यांनी त्यांना 'टूरटूर' नाटकात काम करण्याची संधी दिली होती. दीपक शिर्के यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीवरून केली आणि कालांतराने मोठ्या पडद्यावर आपले स्थान निर्माण केले.