“मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाचं फुफ्फुस…”, विद्याधर जोशीचं वक्तव्य; म्हणाले…
काही दिवसांपूर्वी मुंबईतील दादरच्या कबुतरखान्याचा मुद्दा चर्चेत आला होता. स्थानिकांनी कबुतरांच्या विष्ठेमुळे फुफ्फुसांचा आजार होत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. मुंबई महानगरपालिकेने कारवाई सुरू केली, ज्याला काही लोकांनी विरोध केला. अभिनेता अभिजीत केळकरने या कारवाईला समर्थन दिलं. आता अभिनेता विद्याधर जोशी यांनीही कबुतरखान्यांमुळे होणाऱ्या आजारांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी कबुतरखाने शहराबाहेर हलवण्याची सूचना केली.