Rise And Fall चा पहिला फायनलिस्ट ठरला अरबाज पटेल, निक्कीच्या ‘त्या’ सल्ल्याने बदलला गेम
Rise And Fall या रिअॅलिटी शोचा अंतिम टप्पा जवळ येत असताना स्पर्धा अधिक रंगतदार होत आहे. शोमध्ये रोज येणारे ट्विस्ट्स, बदलणारे नियम आणि स्पर्धकांच्या वादामुळे हा शो चर्चेत आहे. 'बिग बॉस मराठी'चे पाचवे पर्व गाजवलेल्या अरबाज पटेलने फायनलसाठीचं टिकीट जिंकून पहिला फायनलिस्ट होण्याचा मान पटकावला आहे. शोमध्ये Rulers आणि Workers असे दोन गट आहेत. अरबाजची गर्लफ्रेंड निक्की तांबोळीच्या एन्ट्रीनं शोमध्ये मोठा ट्विस्ट आला.