पुणे: कारगिल युद्धात देशसेवा करणाऱ्या जवानाच्या कुटुंबीयांवर ‘बांगलादेशी’ असल्याचा ठपका!
पुण्यातील चंदननगर परिसरात २६ जुलै रोजी मध्यरात्री कारगिल युद्धातील जवानाच्या कुटुंबावर बांगलादेशी असल्याचा आरोप करण्यात आला. शमशाद शेख यांच्या घरात ६०-७० लोकांचा जमाव घुसला आणि गोंधळ घातला. पोलिसांनी कुटुंबाला पोलीस स्थानकात नेले. शेख कुटुंबाला मोठा धक्का बसला असून, पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाईचे आश्वासन दिले आहे.