कोण आहेत पुण्याचे नवे पालिका आयुक्त नवल किशोर राम; कोविड काळात…
IAS अधिकारी नवल किशोर राम यांची पुणे शहर महानगर पालिकेचे नवे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले ३१ मे रोजी निवृत्त होत आहेत. नवल किशोर राम यांनी करोना काळात पुणे जिल्हाधिकारी म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्यांनी पंतप्रधान कार्यालयात उपसचिव आणि केंद्रीय अर्थमंत्रालयात सहसचिव म्हणूनही काम केले आहे. त्यांच्या अनुभवामुळे पुण्यातील सार्वजनिक सेवांमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.