International Yoga Day 2025 : ‘आई कुठे काय करते’फेम अभिनेता बायकोकडून घेतोय योगाचे धडे
२१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. 'आई कुठे काय करते'फेम अभिनेता निरंजन कुलकर्णीने योग दिनानिमित्त त्याच्या बायको मनीषासोबतचा योग शिकतानाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. मनीषा न्यूट्रिशनिस्ट व लाइफस्टाईल एक्स्पर्ट आहे. निरंजन व मनीषा यांनी १ जून २०२५ रोजी पारंपरिक पद्धतीने लग्न केले. निरंजन 'आई कुठे काय करते' मालिकेतून प्रसिद्ध झाला असून त्याच्या आगामी भूमिकेबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.