“अशा गोष्टी करू नका”, अथर्व सुदामेच्या व्हिडीओवर छोटा पुढारीची प्रतिक्रिया; म्हणाला…
सोशल मीडियावर लोकप्रिय कंटेंट क्रिएटर अर्थव सुदामे एका वादात सापडला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्याने 'मूर्ती एक, भाव अनंत' शीर्षकाचं रिल शेअर केलं होतं, ज्यावर काही लोकांनी आक्षेप घेतला. त्यानंतर अर्थवने माफी मागून व्हिडीओ डिलीट केला. 'बिग बॉस मराठी ५' फेम घन:श्याम दरवडेने अर्थवला समर्थन देत त्याच्या संघर्षाची प्रशंसा केली आणि त्याला माफ करण्याचं आवाहन केलं.