‘भाभी जी घर पर है’फेम शुभांगी अत्रे दिवंगत पतीच्या आठवणीत भावूक; म्हणाली…
प्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी अत्रेचे पूर्वाश्रमीचे पती पियुष पुरे यांचे एप्रिल २०२५ मध्ये लिव्हर सिरोसिसमुळे निधन झाले. शुभांगीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पतीच्या आठवणीत भावूक होत त्याच्या व्यसनामुळे हे घडल्याचे सांगितले. दोघांनी २००३ साली लग्न केले होते, पण फेब्रुवारी २०२५ मध्ये घटस्फोट घेतला. 'भाभीजी घर पर है' मालिकेत अंगुरी भाभीच्या भूमिकेसाठी शुभांगीला प्रेक्षकांची पसंती मिळाली.