अशनूर कौरच्या बॉडी शेमिंगबद्दल हिना खानची संतापजनक पोस्ट; म्हणाली, “लाजिरवाणं…”
'बिग बॉस १९'मध्ये तान्या मित्तल आणि नीलम गिरी यांनी अशनूर कौरच्या वजनावर टीका केली होती. या टीकेवर अनेकांनी अशनूरच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर केल्या. सलमान खानने 'वीकेंड का वार'मध्ये तान्या आणि नीलम यांना झापलं. हीना खानने अशनूरसाठी पोस्ट शेअर करत तिचं कौतुक केलं आणि सलमानचे आभार मानले. तिने स्वतःच्या अनुभवांवरून शरीररचना आणि आरोग्याबद्दल विचार मांडले.