प्रणित मोरेशिवाय कुणालाच करमेना, गौरव खन्नाला आलं रडू; तर मालती चहर भावुक होत म्हणाली…
'बिग बॉस १९'च्या घरातून प्रणित मोरेला प्रकृतीच्या कारणास्तव बाहेर पडावं लागलं. त्याला डेंग्यू झाल्याने त्याची प्रकृती बिघडली होती. त्याच्या जाण्याने घरातील सदस्य आणि चाहत्यांना दु:ख झालं आहे. मालती चहर आणि गौरव खन्ना यांना विशेषतः त्याच्या जाण्याचं दु:ख झालं. मालतीला प्रणितची खूप आठवण येतेय, तर गौरवही भावुक झाला. प्रणित पुन्हा 'बिग बॉस'च्या घरात कधी येणार याची सर्वांना उत्सुकता आहे.