या आठवड्यातही एलिमिनेशनपासून सुटका, सगळे ‘सेफ’ पण…; शोमध्ये येणार ‘हा’ मोठा ट्विस्ट
'बिग बॉस १९' हा सलमान खान होस्ट करत असलेला लोकप्रिय शो सुरू होऊन दोन आठवडे झाले आहेत. या आठवड्यात दुसरा ‘वीकेंड का वार’ होणार असून, सलमान खान स्पर्धकांची झाडाझडती घेणार आहे. अद्याप कोणताही स्पर्धक घराबाहेर गेलेला नाही. या आठवड्यातही एलिमिनेशन होणार नसल्याची माहिती आहे. शोमध्ये पहिल्या वाइल्ड कार्ड एन्ट्रीची शक्यता आहे. शुक्रवारच्या एपिसोडमध्ये खाण्यावरून आणि इतर वादांवरून मोठा गोंधळ झाला.