“प्रणित मोरेच जिंकला पाहिजे”, लोकप्रिय अभिनेत्रीचा मराठमोळ्या कॉमेडियनला फुल सपोर्ट; म्हणाली…
'बिग बॉस १९' च्या फिनालेच्या जवळ येत असताना, स्पर्धकांना बाहेरूनही पाठिंबा मिळत आहे. 'बिग बॉस'ची एक्स स्पर्धक आरती सिंगनं प्रणित मोरेला सपोर्ट केला आहे. तिनं त्याच्या खेळाचं कौतुक करताना, तोच शो जिंकावा असं म्हटलं आहे. प्रणितच्या विनोदी शैलीत उत्तर देण्याच्या स्वभावामुळे आणि इतरांशी चांगलं बॉण्डिंग असल्यामुळे आरती त्याला सपोर्ट करत आहे. शिव ठाकरे, अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, अभिजीत केळकर हेही प्रणितला सपोर्ट करत आहेत.