Bigg Boss 19 मधल्या तान्या मित्तलची लक्झरी लाइफ खोटी? झीशान कादरीनं केला खुलासा; म्हणाला…
'बिग बॉस'च्या १९व्या सीझनमध्ये तान्या मित्तल चर्चेत आहे. ग्वाल्हेरची उद्योजक तान्या शोमध्ये ५०० साड्या, ५० किलो दागिने आणि चांदीची भांडी घेऊन आली आहे. तिच्या वक्तव्यांमुळे ती ट्रोल झाली आहे. झीशान कादरीनं तान्याच्या वागणुकीबद्दल प्रतिक्रिया दिली, "तान्या खोटं बोलतेय की खरं, हे लोकांच्या निरीक्षणावर अवलंबून आहे." झीशानच्या मते, तान्याची आणि त्याची छान बाँडिंग होती.