गणेश चतुर्थीनिमित्त धनंजय पोवारची बायको व लेकीनं गायलं लाडक्या बाप्पाचं लोकप्रिय गाणं
'बिग बॉस मराठी' फेम धनंजय पोवार सोशल मीडियावर सक्रिय असून, त्याने नुकताच आपल्या बायको आणि लेकीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांची लेक जान्हवी आणि बायको 'अशी चिक मोत्याची माळ' हे गाणं गाताना दिसत आहेत. नेटकऱ्यांनी या व्हिडीओला भरभरून प्रतिसाद दिला आहे. धनंजय 'बिग बॉस मराठी' सीझन ५ मुळे प्रसिद्ध झाला आणि तो अनेकदा इतर कलाकारांसोबतचे व्हिडीओ शेअर करतो.