श्रेया बुगडेही भाऊ कदम-निलेश साबळेला करतेय मिस, दोघांबद्दल म्हणाली…
झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' या शोला प्रेक्षकांचा खूप प्रतिसाद मिळाला होता. १० वर्षं मनोरंजन केल्यानंतर शोने ब्रेक घेतला आणि आता नव्या पर्वासह परतला आहे. मात्र, या नव्या पर्वात नीलेश साबळे आणि भाऊ कदम नसल्याने प्रेक्षक त्यांना 'मिस' करत आहेत. श्रेया बुगडेनेही त्यांच्या अनुपस्थितीबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. नवीन पर्वात नवीन टॅलेंट आणि वेगळा फॉरमॅट पाहायला मिळणार आहे.