कहो ना प्यार है…; हिंदी गाण्यावर मराठी कलाकारांचा भन्नाट डान्स, व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस
सोशल मीडियावर मराठी कलाकार सक्रीय असून, ते आपले स्टायलिश फोटो आणि व्हिडीओ शेअर करतात. नुकतेच हृषीकेश शेलार, सुशील इनामदार, अनघा अतुल आणि समृद्धी मोहरीर यांनी 'कहो ना प्यार है' गाण्यावर पर्थच्या समुद्रकिनारी डान्स केला. हा व्हिडीओ चाहत्यांना आवडला असून, त्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. हे कलाकार 'शिकायला गेलो एक' नाटकाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत.