‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम विजय आंदळकरची स्वप्नपूर्ती, मुंबईत खरेदी केलं हक्काचं घर
'लग्नानंतर होईलच प्रेम' फेम अभिनेता विजय आंदळकरने मुंबईत स्वत:चं २ बीएचके घर खरेदी केलं आहे. १८ वर्षांच्या संघर्षानंतर त्याचं हे स्वप्न पूर्ण झालं. अंधेरीतील छोट्या खोलीतून प्रवास सुरू करून, आता पवईत लेक व्ह्यू असलेलं घर घेतलं आहे. विजयने अनेक मालिकांमध्ये काम केलं असून, सध्या 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.