“रस्ता उरलाच नाही; फक्त खड्डे…”, घोडबंदर रस्त्याच्या दुरवस्थेबाबत अभिनेत्याचा संताप
ठाणे-घोडबंदर रोडवरील खड्ड्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि त्रासाबद्दल अभिनेता मिलिंद फाटक यांनी चिंता व्यक्त केली आहे. 'तुला जपणार आहे' मालिकेसाठी अंधेरीहून ओवळा नाक्यापर्यंत प्रवास करताना त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. त्यांनी प्रवासातील बिकट परिस्थितीवर भाष्य करत, नागरिकांना चांगला रस्ता मिळणं हा त्यांचा हक्क असल्याचं सांगितलं. संबंधितांनी या समस्येकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे.