“आणि गणपती बाप्पा न्यायला आले”, संकर्षण कऱ्हाडेने सांगितला गणपतीपुळेमधील ‘तो’ अनोखा अनुभव
संकर्षण कऱ्हाडेने गणपतीपुळे मंदिरातील त्याचा खास अनुभव शेअर केला आहे. एकदा त्याने वडिलांना गणपती बाप्पा स्वतः दर्शनाला घेऊन येईल असं म्हटलं होतं. नंतर रत्नागिरीतील प्रयोगानंतर एक पुजारी त्याला भेटला आणि गणपतीपुळे दर्शनासाठी घेऊन गेला. तिथे संकर्षणने अभिषेक केला. त्याने सहज म्हटलेली गोष्ट सत्यात उतरली, हे त्याने सांगितले.