“आता कुठे गेले सगळे?” महादेवी हत्तीणीबद्दल मराठी अभिनेत्रीचा थेट सवाल; म्हणाली, “राजकारण…”
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर कोल्हापूरच्या शिरोळमधील नांदणी गावातील महादेवी हत्तीणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. गावकऱ्यांनी तिला अश्रूंनी निरोप दिला. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हत्तीणीला गुजरातला पाठवण्यात आलं. मराठी मनोरंजन सृष्टीतूनही यावर प्रतिक्रिया येत आहेत. अभिनेत्री आरती सोळंकीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत हत्तीणीच्या स्थलांतरावर टीका केली आहे.