सुदेश म्हशिलकर यांनी स्पष्टीकरण दिल्यावर प्राची पिसाट म्हणते, “चूक फक्त मुलीचीच…”
ज्येष्ठ मराठी अभिनेते सुदेश म्हशिलकर यांनी फेसबुकवर आक्षेपार्ह मेसेज केले होते, असा आरोप अभिनेत्री प्राची पिसाटने केला आहे. तिने मेसेजचे स्क्रीनशॉटही पोस्ट केले. म्हशिलकर यांनी उत्तर देत अकाउंट हॅक झाल्याचा दावा केला. प्राचीने त्यावर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणावर समाधान नसल्याचे सांगितले आहे.