फोटोमधील ‘या’ चिमुकलीला ओळखलंत का? ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये साकारलेली महत्त्वपूर्ण भूमिका
लोकप्रिय अभिनेत्री सानिका काशिकरने सोशल मीडियावर तिच्या बालपणीच्या आठवणी शेअर केल्या आहेत. 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत लक्ष्मीची भूमिका साकारून प्रसिद्ध झालेल्या सानिकाने इन्स्टाग्रामवर 'आस्क मी' सत्रात बालपणातील शिस्तबद्ध जीवनाबद्दल सांगितले. तिने वडिलांसोबतचा फोटोही शेअर केला. सानिका सोशल मीडियावर सक्रिय असून तिचे फोटो व व्हिडीओ चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहेत.