टेलिव्हिजनच्या कलाकारांनाही राष्ट्रीय पुरस्कार देण्याची अभिनेत्रीची मागणी, म्हणाली…
नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये शाहरुख खान, विक्रांत मॅसी आणि राणी मुखर्जी यांना सन्मानित करण्यात आले. मराठी चित्रपटांनीही उल्लेखनीय कामगिरी केली. मात्र, टीव्ही अभिनेत्री रुपाली गांगुली यांनी टीव्ही कलाकारांकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितलं की, कोविड काळातही टीव्ही कलाकारांनी अखंड काम केलं, पण त्यांचं कौतुक झालं नाही. त्यांनी सरकारकडे टीव्ही कलाकारांसाठीही सन्मानाची मागणी केली.