Bigg Boss च्या सीझनसाठी सलमान खान खरंच १५० कोटी रुपये घेतो? निर्मात्यांनीच केला खुलासा
बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या 'बिग बॉस' शोच्या मानधनाबाबत अनेक चर्चा होतात. 'बिग बॉस'चे निर्माते ऋषी नेगी यांनी सांगितले की, सलमान खान एका एपिसोडसाठी कोट्यवधी रुपये घेतो. सलमानवर पक्षपातीपणाचे आरोपही होतात, परंतु नेगी यांनी स्पष्ट केले की, सलमान स्वतःचं मत बनवतो आणि त्याला कोणत्याही गोष्टीसाठी जबरदस्ती केली जात नाही. मानधनाबाबत नेमके आकडे माहीत नसले तरी सलमान त्याच्या प्रत्येक पैशाचा हकदार आहे.