धाकड गर्ल! समृद्धी केळकरने ४० फुट खोल विहीरीत मारली उडी, कसा शूट झाला सीन? पाहा व्हिडीओ
समृद्धी केळकरने 'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली. आता ती 'हळद रुसली कुंकू हसलं' या मालिकेत शेतकरीण कृष्णाची भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी तिने ३०-४० फूट खोल विहरीत उडी मारली आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. तिच्या धाडसाचे अनेक कलाकार आणि चाहत्यांनी कौतुक केले आहे.