शशांक केतकरच्या मुलाने केलेल्या ‘त्या’ कृतीचं होतंय कौतुक, अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
अभिनेता शशांक केतकरने स्वातंत्र्य दिनानिमित्त त्याच्या मुलाचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याचा मुलगा ऋग्वेदने स्वतःच्या हाताने तिरंगा बनवून घराच्या बालकनीतील कुंडीत लावला आहे. व्हिडीओमध्ये ऋग्वेदने बाजारातून आणलेला आणि स्वतः बनवलेला तिरंगा दाखवला आहे. शशांकच्या या पोस्टला नेटकऱ्यांनी खूप कौतुक केलं आहे.