शशांक केतकरच्या तक्रारीची BMC ने घेतली दखल; अभिनेत्याने शेअर केला नवीन व्हिडीओ
मराठी अभिनेता शशांक केतकरने मालाडच्या मढमधील रस्त्याच्या मधोमध असलेल्या झाडांबद्दल व्हिडीओ शेअर करत अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्याने महानगरपालिका आणि स्थानिक प्रशासनाकडे झाडांना रिफ्लेक्टर लावण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता प्रशासनाने त्वरित दखल घेत झाडांना रिफ्लेक्टर लावले आहे. याबद्दल शशांकने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत प्रशासनाचे आभार मानलेत. तसंच त्याने अशा समस्यांबद्दल नागरिकांना तक्रार नोंदवण्याचे आवाहनही केलं आहे.