अखेर अमृता धर्माधिकारी कुटुंबाची सून झालीच! ‘कोण होतीस तू काय झालीस तू’मध्ये ट्विस्ट
स्टार प्रवाहवरील 'कोण होतीस तू काय झालीस तू' ही मालिका प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन करीत आहे. मालिकेत यश आणि कावेरी यांच्या लग्नाचा ट्विस्ट आला आहे. यश-कावेरीच्या लग्नामुळे अमृताचा प्लॅन फसला आहे. आता अमृता उदयशी लग्न करून धर्माधिकारी कुटुंबात येणार आहे. या नव्या ट्विस्टमुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. १७ ऑक्टोबर रोजी हा ट्विस्ट प्रेक्षकांना पाहता येणार आहे.