“मला तिची भीती…”, अभिज्ञा भावेच्या ऑनस्क्रीन भावाने सांगितला तिच्यासह काम करण्याचा अनुभव
'तारिणी' ही नवी मालिका ११ ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे. यात शिवानी सोनार, अभिज्ञा भावे, स्वराज नागरजोगे, आणि प्रशांत केनी महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. मालिकेच्या प्रमोशनसाठी अभिज्ञा व प्रशांतने 'अल्ट्रा मराठी'ला मुलाखत दिली. प्रशांतने अभिज्ञासह काम करण्याचा अनुभव सांगितला, तिच्या व्यक्तिमत्त्वामुळे मला घाबरण्याचा अभिनय करावा लागत नाही.असं तो म्हणाला. त्याने अभिज्ञाबद्दल त्याला आदरयुक्त भीती असल्याचं म्हटलं आहे.