“सौरभचं नाव घेते…”, योगिता चव्हाणने नवऱ्यासाठी लग्नात घेतलेला ‘हा’ हटके उखाणा
कलर्स मराठी वाहिनीवरील 'जीव माझा गुंतला' मालिकेतील मल्हार आणि अंतरा म्हणजेच सौरभ चौघुले आणि योगिता चव्हाण यांनी खऱ्या आयुष्यातही लग्न केले. ३ मार्च २०२४ रोजी त्यांनी लग्नगाठ बांधली. लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते. वर्षपूर्तीनंतर योगिताने तिच्या युट्यूब चॅनलवर लग्नाचा खास व्हिडीओ शेअर केला. यावेळी त्यांनी एकमेकांसाठी उखाणा घेतला. यात त्यांनी 'जीव माझा गुंतला' मालिकेचं नाव घेत हटके उखाणे घेतले. त्यांच्या लग्नाला मराठी टेलीव्हिजन विश्वातील अनेक कलाकार उपस्थित होते.