ChatGPT: सॅम अल्टमन स्वत:च म्हणतात की OpenAI च्या CEO पदासाठी ते योग्य नाहीत!
OpenAI चे CEO सॅम अल्टमन यांनी ओपन एआयच्या भविष्यातील सार्वजनिक मालकीबद्दल विधान केले आहे. त्यांनी सांगितले की, भविष्यात ओपन एआय सार्वजनिक कंपनी झाल्यास ते CEO पदासाठी योग्य नसतील. ओपन एआय कम्प्युटिंग इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. चॅटजीपीटीने मे २०२३ पासून २ बिलियन डॉलर्सची कमाई केली आहे, जी स्पर्धक अॅप्सपेक्षा ३० पट अधिक आहे.