मुंबईतील रिक्षाचालकाची कमाई ऐकून थक्क व्हाल
मुंबईतील एका रिक्षाचालकाने अनोख्या पद्धतीने दिवसाला २० ते ३० हजार रुपये कमावण्याची युक्ती शोधली आहे. अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासाबाहेर रिक्षा लावून, व्हिसा अपॉइंटमेंटसाठी येणाऱ्या लोकांच्या बॅगा सांभाळण्याचे काम तो करतो. प्रत्येक बॅगेसाठी तो हजार रुपये घेतो. त्यामुळे महिन्याला ५ ते ८ लाख रुपये कमावतो. ही कल्पना लिंक्डइनवर शेअर झाल्यानंतर चर्चेत आली आहे.