सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन ऑफर करण्यासाठी रिलायन्स जिओ प्रसिद्ध आहे. ग्राहकांना अधिक आकर्षित करण्यासाठी जिओकडुन सतत नवीन प्लॅन लाँच केले जातात. आता सर्वजण ड्युअल सिम वापरतात, त्यातील एक सिम बऱ्याच वेळा जिओचे असते. दोन सिम असतील तर ते दोन्ही सिम रिचार्ज करण्यासाठी डबल खर्च येतो, अशात सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅनची निवड केली जाते. तर काही जणांना फक्त सिमकार्ड चालू ठेवण्यासाठी रिचार्ज करावा लागतो. अशावेळी तुम्ही जिओच्या सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅनची निवड करू शकता.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
जिओचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन
- जिओच्या सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅनची किंमत ७५ रुपये आहे.
- हा रिचार्ज प्लॅन २३ दिवसांसाठी उपलब्ध होतो.
- यामध्ये एकुण २.५ जीबी डेटा दिला जातो. यासह २०० एमबी एक्स्ट्रा डेटा दिला जातो.
- या प्लॅनमध्ये ५० फ्री एसएमएस करण्याची सुविधा उपलब्ध होते.
- या रिचार्ज प्लॅनवर जिओ सावन, जिओ सिनेमा अशा जिओ अॅप्सचा फ्री एक्सेस मिळतो.
First published on: 09-10-2022 at 15:40 IST
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 75 rupees jio cheapest recharge plan offers unlimited calling and more than 2 gb data pns